खर्गे यांच्या हस्ते महाराष्ट्र काँग्रेस ‘पॉवर बैठकीला’ला सुरुवात…

0
6

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एमपीसीसी) नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना एकजूट, शिस्तबद्ध व निवडणूक सज्ज बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय उच्चस्तरीय नेतृत्व शिबिराचा शुभारंभ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आभासी (ऑनलाईन) पद्धतीने सोमवारी दि. ११ ऑगस्ट रोजी करणार आहेत… या शिबिराची सांगता दुसरा दिवस अर्थातच मंगळवारी सायंकाळी होणार आहे… दरम्यान पुण्याजवळील एका हिल स्टेशनवर होणारे हे शिबिर एमपीसीसीच्या ३८७ सदस्यांच्या नवीन ‘जंबो’ संघटनेच्या घोषणेनंतर होत असून, आगामी राजकीय लढायांच्या पार्श्वभूमीवर संघटनशक्तीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे…

या कार्यक्रमात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत… त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राज्यातील विविध विभागांचे निरीक्षक, ज्यात कोकण विभाग निरीक्षक म्हणून सात जिल्ह्यांचा समावेश असलेले माननीय वरिष्ठ नेते एआयसीसी सरचिटणीस माननीय यू. बी. वेंकटेश, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील आणि काँग्रेस कार्यसमितीचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे… शिबिरात पॅनल चर्चासत्रे, रणनीती बैठक, तसेच राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार असून, पक्षांतर्गत एकजूट मजबूत करण्यासाठी व महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचा ठोस संदेश या शिबिरातून दिला जाणार आहे…