मालेगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
गोपनीय माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर पाटणे फाटा येथे तीन गांजा विक्रेते येणार असल्याची खबर पोलिसांनी मिळताच तात्काळ सापळा रचला… पोलिसांना पाहताच आरोपी पळू लागले, पण पोलिसांनी शिताफीने घेरावबंदी करून त्यांना पकडले…
झडतीत चार ते साडेचार किलो गांजा हस्तगत झाला, ज्याची बाजार किंमत सुमारे ९० हजार रुपये आहे. गुन्हा क्रमांक ६०५/२०२५अंतर्गत भा.दं.वि. आणि NDPS Act १९८५ कलम ८ (C), २०(B), २०(B)IIA अंतर्गत अमजद खान अहमद खान, फिरोज खान युसुफ खान, अब्दुल रजाक सफदर खान यांच्यावर पोलिस हवालदार रतीलाल वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे… ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली…