मनमाडजवळ धावत्या ओव्हरलोड ट्रक चा थरार… ट्रक पलटी; जीवितहानी थोडक्यात टळली…

0
6

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

पुणे–इंदौर महामार्गावर मनमाडजवळ ओव्हरलोड ट्रकचा थरारच बघायला मिळाला… क्षमतेपेक्षा जास्त मालाने भरलेला हा ट्रक धावत असतानाच काही अंतरावर जाऊन पलटी झाला… सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे… विशेष म्हणजे, ट्रकच्या मागे दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाने हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये कैद केला आहे…

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ट्रक क्षमतेपेक्षा जास्त मालाने इतका झुकलेला होता की पाहताच धोक्याची जाणीव होत होती… तरीदेखील चालकाने वेग कमी न करता ट्रक चालवला… मनमाडपासून काही अंतरावरच तोल जाऊन ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी झाला…  त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालकाला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे…

घटनेनंतर नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की, “हायवेवर अशा ओव्हरलोड ट्रकची वर्दळ सुरू असताना आरटीओ आणि वाहतूक पोलीस करतात तरी काय ?” असा सवाल स्थनिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे…