महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
खुटिल-गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल रावढल… येथील मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता १०वी, १२वी व पदवीधर विद्यार्थी यांचा गुणगौरव आणि १ली ते १०पर्यतच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे माजी अध्यक्ष विजय साळवी गुरुजी साहित्यिक गंगाधर साळवी मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव मंडळाचे चिटणीस जितेंद्र जाधव प्रवीण साळवी जयंती उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष योगेश कासारे विनायक हाटे , दीपक मोरे नामदार भरत शेठ गोगावले यांचे पी ए महेंद्र शिर्के, निलेश जाधव शशिकांत, कासारे ग्रुप ग्रामपंचायत वराठीगावचे सरपंच सेजल कासारे मंडळाचे उपाध्यक्ष, दीपेश भाऊ जाधव डॉ. मोहिते खैरे सर दीपक साळवी, धर्मेंद्र जाधव मंडळाचे खजिनदार दीपक साळवी, मंडळाचे उपाध्यक्ष नरेश साळवी व बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होते…
सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले यानंतर गंगाधर साळवी यांनी मुलांना मार्गदर्शन केले… सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला… खाडीपट्ट्यातून बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते… प्रथम पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले… यानंतर सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले… कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सभासद व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला… या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस प्रफुल्ल पवार व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे आभार प्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी केले…