खारघर शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):-
सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जातो.वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज असतात.मात्र,याच दहीहंडीच्या उत्सवात काही वेळेस उंच थरांवरुन पडून गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते.गेल्या काही वर्षांत नवी मुंबई आणि मुंबईत या उत्सवादरम्यान कित्येक गंभीर अपघात झाले आहेत,ज्यामध्ये डोक्याला दुखापत, फ्रॅक्चर आणि पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींचा समावेश आहे.
अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलने २४×७ उपलब्ध +९१ ९१७२९७०१११ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. जखमी गोविंदांवर त्वरीत उपचाराकरिता या क्रमांकावर संपर्क साधल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. दुखापतग्रस्त गोविंदांना गोल्डन अवरमध्ये म्हणजेच पहिल्या ६० मिनिटांत उपचार करता येतील. वेळीच उपचाराने एखाद्याचा अमुल्य जीव वाचवता येऊ शकतो आणि दीर्घकालीन गुंतागुंत टाळता येते.
न्यूईरा हॉस्पिटलने दहीहंडीच्या काळात अपघातग्रस्त गोविंदासाठी खास १० आपत्कालीन बेड राखीव ठेवले आहेत. जागेअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित रहावे लागू नये आणि पीडितांना त्वरित उपचार मिळावेत याची खास काळजी याठिकाणी घेण्यात आली आहे.
नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी सांगतात की, उत्सवाचा काळ हा आनंद देणारा असतो परंतु त्याबरोबरच सुरक्षा नियमांचे योग्य पालन करत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणीत होतो. दरवर्षी, आम्ही दहीहंडी दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत, मणक्याच्या आणि न्यूरोलॉजिकल दुखापती असलेल्या अनेक रुग्णांवर उपचार करतो. आमचा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक आणि राखीव बेडची सुविधा हे गोविंदाना वेळीच उपचार मिळविण्यात नक्कीच मदत करेल. वेळीच उपचार केल्याने केवळ जीव वाचत नाहीत तर आयुष्यभराकरिता येणारे अपंगत्व देखील टाळता येते.
न्यूईरा हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर टीम आपत्कालीन सेवेत कार्यरत डॉक्टर्स, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिक तज्ञ आणि क्रिटिकल केअर कर्मचारी यांचा समावेश आहे. अपघात झाल्यास तातडीने न्यूईरा आपत्कालीन हेल्पलाइन +९१ ९१७२९७०१११ यावर संपर्क साधण्याचे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.