मालेगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
देशभरात ७८ वा स्वातंत्र्यदिन जल्लोष, देशभक्ती आणि अभिमानाने साजरा होत असताना… मालेगावात मात्र नगर आयुक्त रवींद्र जाधव यांच्याविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला.
भुईकोट किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर, आयुक्त परतत असतानाच सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांनी साडी–चोळी देऊन टोमणे लगावण्याचा अनोखा निषेध केला.
आंदोलनातील प्रदर्शनकर्त्यांचा ठाम आरोप आहे की –शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय निकृष्ट आहे…भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे…बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत…अनेक नागरी समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत…नागरिकांनी स्पष्ट केलं की त्यांनी याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट, तक्रारी “हटवून दाखवल्या” जाऊन फाईल्स बंद करण्यात आल्याचा आरोप आहे.
भुईकोट किल्ल्यावरच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर, आयुक्तांच्या परतीच्या मार्गावर काही सामाजिक कार्यकर्ते सज्ज होते. त्यांनी साडी–चोळी देऊन “आयुक्तांनी आपला पदाचा मान राखावा” असा उपरोधिक संदेश दिला.या प्रकारामुळे काही क्षण तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
जर सरकारी दप्तरात साडी–चोळी देण्याची पद्धत सुरू झाली, तर अधिकारी एकदम प्रामाणिक होतील!”हा उपरोध नागरिकांच्या मनातील चीड आणि निराशा उघड करतो.या अनोख्या आंदोलनावर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, नागरिकांच्या भावना तीव्र असून, त्यांचा रोष स्वातंत्र्यदिनी शांत झाला नाही हे स्पष्ट दिसतं.

