कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
देशभरात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नेरळ येथे सात वाजून 16 मिनिटांनी नेरळ पोलीस ठाणे येथे प्राभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर यांच्या हस्ते, सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले, नेरळ येथील तलाठी कार्यालयांमध्ये ग्रामसेवक कार्लेकर यांच्या हस्ते 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले असून उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून देशभक्तीची गगनभेदी घोषणांनी वातावरण भारावून टाकले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी गायली.कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून देत, नागरिकांना एकतेचा आणि विकासाचा संदेश देण्यात आला.