उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
भारत देशाच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागासवर्गीय आदिवासी वाडीतील कुटुंबांना सौर कंदील चे वाटप करण्यात आले असून दिव्यांग लाभार्थी सन २०२५/२६ पाच टक्के निधी लाभार्थ्यांना वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोप्रोली येथील पहिली ते सातवी मधील प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलांचा गुणगौरव तसेच शिष्यवृत्ती चे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मारक कोप्रोली येथे करण्यात आला होता.या कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रणजीत म्हात्रे, माजी उपसरपंच गिरीश म्हात्रे ,विपुल म्हात्रे,नीरज म्हात्रे,माजी सदस्य शेखर ठाकूर व गावातील ज्येष्ठ पदाधिकारी विश्वनाथ पाटील, विवेकानंद म्हात्रे, विकी म्हात्रे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी तथा उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सर्व नियोजन ग्राम पंचायत अधिकारी प्रवीण खैरे यांनी केले .त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी योगिता म्हात्रे शुभा म्हात्रे,सुचिता पाटील,मनोहर कातकरी या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले होते.