उरण तालुक्यात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ उत्साहात साजरा…

0
18

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उरण शहरासह उरण तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम  यांच्या हस्ते ‘तहसिल’ या शासकीय प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.

उरण शहरातील उरण नगर परिषद, पंचायत समिती कार्यालय, कनिष्ठ न्यायालय, उरण मोरा सागरी पोलीस स्टेशन, न्हावा शेवा पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ,मुख्याधिकारी समीर जाधव,उप अभियंता नरेश पवार, न्यायालयाचे न्यायाधीश, वकील व शासकीय वकील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

उरण तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात,शाळा, विद्यालयाच्या प्रांगणात, तलाठी कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिरनेर येथील १९३० सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना,१९८४ सालच्या जासई येथील शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत शाळा,काँलेज्या विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरीचे आयोजन करत गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.