चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी व अधिकारी, कर्मचारी यांनी अतुलनीय कामगिरी केल्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून डंका वाजवला.महाराष्ट्र राज्य सरकारने १०० दिवसांचा उपक्रम जाहीर करून जनहिता साठी व शासकीय कार्यालय,निमशासकीय कार्यालयात राबविण्याचे निर्देश दिले होते.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला निर्देशानुसार १३.०१.२०२५ च्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयाकरिता १०० दिवसाचा उपक्रम हाती घेतला होता तसेच १० मुद्द्यांवर प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.हा उपक्रम गटविकास अधिकारी संदीप कराड आणि कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली.पंचायत समिती खालापूर यांनी या उपक्रमांतर्गत वेब साईट,कार्यालयीन सोयी सुविधा,स्वच्छता,तक्रार निवारण, सुलभ जीवनमान,गुंतवणूकीस चालना,तंत्रज्ञानाचा वापर या बाबतीत खालापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट, प्रभाविपणे व अतुलनीय कामगिरी बजावली. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक १०० गुणांपैकी ९३ गुण मिळवून सदर अभियान यशस्वी केले. खालापूर पंचायत समितीला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्यामुळे खालापूर पंचायत समितीच्या यशस्वी कार्यामुळे तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.माझी वसुंधरा अभियान ५.० हे देखील यशस्वी केल्याने कोकणात तांबाटी ग्राम पंचायत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता, तर वडगांव आणि साजगाव यांनीही पुरस्कार प्राप्त करून राज्यात नामांकन मिळाले आहे.विस्तार अधिकारी पंचायत विनोद चांदोरकर, शैलेंद्र तांडेल व कर्मचारी यांचा मोठा सहभाग आहे. अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमास विनोद चांदोरकर,समूह समन्वयक संदीप मोगारे व रविकिरण राठोड हेही उपस्थित होते.