चौक पोलीस दूर क्षेत्र येथे प्रभारी विशाल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण…

0
9

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज चौक पोलीस दूर क्षेत्र येथे प्रभारी विशाल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी विद्यार्थी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्य दिन ७९ वा आज देशभर मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जात आहे. राष्ट्रीय सण साजरा करण्यात येत असून देशभक्ती ची गाणी ऐकू येत आहेत,चौक पोलीस दूर क्षेत्र येथे प्रभारी विशाल पवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे, खालापूर पोलीस पाटील संघटना अध्यक्ष अनंत ठोंबरे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हर्षल हनुमंते, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.