खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण…

0
8

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज ७९ वर्धापन दिवस. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज देशभरात ध्वजारोहण करण्यात आले नसून देशभक्ती गीतांची धुण ऐकण्यास मिळत आहे.खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलिसांनी सलामी दिली. राष्ट्रगीता नंतर इनरव्हील क्लब यांच्या वतीने कचरा मुक्ती पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी प्रशासन यांच्या वतीने जगदीश मरागजे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, उपस्थित नागरिक यांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल नायब तहसीलदार विकास पवार, नायब तहसीलदार भोईर, नायब तहसीलदार तिऱ्हेकर, पोलीस उप निरीक्षक विशाल पवार, शिवाजी जुंदरे, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, माणिक सानप, भरत सावंत, संदेश पानसरे, सचिन वाघ,ग्रामस्थ,कर्मचारी, तलाठी,पोलीस, देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.