चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खालापूर पोलीस ठाण्यात इनरव्हील क्लब खालापूर खोपोली यांच्या वतीने पोलीस आणि कैदी यांना राखी बांधून भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खालापूर खोपोली येथील इनरव्हील क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून खालापूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस बांधव व कैदी यांना राखी बांधून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लब च्या महिला सदस्य यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, चौक दूर क्षेत्र प्रभारी विशाल पवार, पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे, पोलीस कर्मचारी व कैदी यांना पंचारती करून राखी बांधली. यावेळी इनरव्हील क्लब यांच्या सामाजिक कामाची माहिती देण्यात आली, तर सामाजिक उपक्रम राबविताना निधीची कमतरता भासू लागते, याची जाणीव करून देण्यात आली. शिक्षण आणि वाचन केल्यास सर्व काही शक्य असते, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य केल्यास समाजाची उन्नती होईल, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले, सामाजिक कार्यास लागणाऱ्या मदतीला हातभार लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रक्षा बंधन झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडून भाऊ या नात्याने भेट वस्तू देण्यात आली. यावेळी इनरव्हील अध्यक्षा दिना शहा, सचिव मधुमती पाटील, पूर्व अध्यक्ष क्षमा आठवले, निर्मलाताई कुंटे, राजश्री मुंदडा, जयश्री यांच्या सह महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.