अखेर चौक बाजारपेठ मधून प्रभात फेरी निघाली, रस्ता झाल्याने सर्वच खुश…

0
7

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

अखेर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चौक बाजारपेठ मधून विद्यार्थी यांची प्रभातफेरी वाजत गाजत निघाली,वाहनचालकांसह नागरिक यांच्यात समाधान व्यक्त होताना दिसत आहे. चौक बाजारपेठमधील रस्ता कधी मोकळा श्वास घेणार? असा प्रश्न चौक ग्रामस्थ, व्यापारी,विद्यार्थी,परिसरातील नागरिक,परिसरातील ग्राहकांना पडला होता.अनधिकृत बांधकाम,फेरीवाले, गटारावर बसून व्यवसाय करणे, विद्दुत खांब, वाहत्या पाण्याचे योग्य नियोजन, बेशिस्त पार्किंग, पाण्याची पाईप लाइन यामुळे रस्त्याच्या कामाची गती संथ होत होती, ही कामाची गती अशीच राहिल्यास गणपती बाप्पा मोरया यांचे आगमन सुखकर होईल का?अशीही अपेक्षाही व्यक्त करणे चुकीचे होते, दोष मात्र ठेकेदार यांना जात होता. यामुळे नागरिक यांच्यात संताप व्यक्त होत होता.

नागरी सुविधा निर्माण होताना आणि त्या पूर्ण होताना त्रास होतोच,अशी भावना निर्माण झाली होती! पण हे कुठवर चालणार असाही प्रश्न उपस्थित होत गेला.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नेते, पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक मंडळ, वीज वितरण अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, बांधकाम विभाग, व्यापारी, रिक्षा चालक मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. चौक दूर क्षेत्र प्रभारी विशाल पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करून कामाची माहिती घेतली, सर्वांनी सहकार्य करून गणपती आगमन पूर्वी हा रस्ता पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली, मात्र सर्वांचे सहकार्य लाभल्यास रस्ता पूर्ण होऊन १५ ऑगस्ट रोजी खड्डे मुक्त वातावरणात विद्यार्थी,नागरिक, देशप्रेमी यांची प्रभात फेरी काढण्यात येईल, असे आश्वासन ठेकेदार यांनी दिले होते. आज खड्डे मुक्त रस्त्यावरून विद्यार्थी, देशप्रेमी यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत, वाजत गाजत चौक बाजारपेठ मधून प्रभात फेरी काढली, त्यामुळे नागरिक,व्यापारी,विद्यार्थी,ग्राहक,रिक्षा चालक मालक यांच्यात समाधानाची भावना निर्माण झाली आहे.