महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहेत. कोकरे विद्यालयाच्या क्रीडांगणात संपन्न झालेल्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून अव्वल स्थान निर्माण केले आहे. आपला कौशल्यपूर्ण खेळ प्रदर्शित करीत त्यांनी आपल्यासमोर आलेल्या प्रतिस्पर्धी संघांवर खिलाडी वृत्तीने मात करीत आगेकूच केली आहे. त्याबद्दल वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.अनंत रेवाळे साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि कार्यवाह मा.श्री.राजन कुर्डूनकर सर,उपाध्यक्ष मा.श्री.दिलीप साळवी,माजी कार्यवाह मा.प्रभाकर सागवेकर, तालुका क्रीडा समन्वयक श्री राजुदास पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री.दीपेश जाधव सर यांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.