नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आरंभ स्पामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई करत भांडाफोड केला. वरिष्ठ निरीक्षक डॉ.आँचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा हिला अटक केली.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून स्पामध्ये सापळा रचला होता.या कारवाईत कानपूर, दिल्ली, बिहार, मिजोराम आणि नाशिक येथील पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपीकडून आर्थिक फायद्यासाठी महिलांना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे…
या प्रकरणात आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर नाशिक शहरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, अशा अनैतिक व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..