खोपोलीत कचऱ्याचा डोंगर,तरीही बेस्ट सीईओचा किताब!नागरिक संतप्त… पुरस्कार मिळाला…पण खोपोलीकरांच्या जीवनात बदल कधी?…

0
6

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खोपोली शहरात कचरा,पाणीटंचाई,खड्डेमय रस्ते,अस्वच्छता आणि बेसुमार भ्रष्टाचार या समस्या डोक्यावर घेत असताना, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रायगड जिल्ह्यातील ‘बेस्ट सीईओ’ठरले आहेत.पुरस्कार मिळाला,पण तो नेमका कोणत्या कामगिरीसाठी दिला गेला आणि पुरस्काराच्या निकषात शहरातील वास्तव परिस्थिती कशी मोजली गेली, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, पुरस्कार मिळाला,अभिनंदनही झाले,पण शहरातील समस्यांचा डोंगर मात्र तसाच आहे.त्यामुळे पुरस्कार घेऊन फोटो काढण्यापेक्षा खोपोलीकरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात,अशी मागणी केली जात आहे. खोपोलीत गल्लोगल्ली,पटांगण,चौकाचौकात,शाळेसमोर,बस स्टँड,रेल्वे स्टेशन परिसर, भाजी व मटण मार्केट,रिक्षा स्टँड आणि रहदारी भागात कचर्‍याचे ढीग दिसत आहेत.लाखो-कोट्यवधी रुपयांचा स्वच्छता खर्च केला जात असतानाही शहराची स्थिती जसंच्या तशीच आहे.शाळांच्या परिसरात साचलेल्या घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे..एकेकाळी शहरात कचराकुंड्या (डस्टबिन) होत्या आणि घंटा गाडी वेळेवर येत असे.आता डस्टबिन हटवल्या गेल्या असून घंटा गाडी वेळेवर येत नाही,त्यामुळे नागरिकांना घरातच कचरा साठवावा लागतो किंवा उघड्यावर टाकावा लागतो… उघड्यावर टाकलेला कचरा वेळेवर न उचलल्यामुळे डासांची संख्या प्रचंड वाढली आहे, परिणामी संसर्गजन्य रोगांचा धोका वाढत चालला आहे.सच्छतेवर कडक देखरेख ठेवावी. प्रत्येक वॉर्डमधील कचराकुंड्या पुन्हा बसवाव्यात.घंटा गाडी वेळेवर चालवावी.डेंग्यू-मलेरियावर नियंत्रणासाठी मच्छरदाणी व हेल्थ कार्ड मोफत उपलब्ध करून द्यावे. मुख्याधिकाऱ्यांनी शहराचा दौरा करून समस्यांचा आढावा घ्यावा.अशी मागणी नागरिकांनी केली आहे…