रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशन व रोहा अष्टमी अलखैरिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कै.जनार्दन शेडगे ट्रस्टतर्फे सायन्स ज्युनियर कॉलेज आणि रेवा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी २ संगणक,१ प्रिंटर आणि १ बायोमेट्रिक मशीन भेट स्वरूपात देण्यात आले.शुक्रवार,दि. २२ ऑगस्ट रोजी रेवा स्कूल येथे छोटेखानी पण भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती.दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित कै. जनार्दन शेडगे यांनी कष्ट, मेहनत आणि समाजसेवेच्या जोरावर शहरात व समाजात एक विशेष स्थान निर्माण केले.त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये मदतीचा हात दिला.
त्यांची ही परंपरा आज त्यांची दोन्ही कर्तबगार मुले यशस्वीपणे पुढे नेत आहेत, हे कौतुकास्पद असल्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.“रोहा एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनच्या ११ वी-१२ वी सायन्स ज्युनियर कॉलेजला खासदार सुनील तटकरे साहेबांनी मान्यता आणून दिली आहे. भविष्यात या कॉलेजचे महाविद्यालय होईल आणि विद्यार्थ्यांना आधुनिक सोयी-सुविधा मिळतील.आजच्या स्पर्धात्मक युगात विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान अत्यावश्यक बनले आहे.मुस्लिम समाजात महिलांचे शिक्षण पूर्वी कमी होते, पण आता मुस्लिम महिला डॉक्टर, वकील, अभियंते होत आहेत.याठिकाणी शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे आणि इतर महानगरांत उच्च शिक्षणासाठी जात आहेत, हे एक अभिमानास्पद यश आहे.कै. जनार्दन शेडगे ट्रस्टतर्फे दिलेले संगणक, प्रिंटर आणि बायोमेट्रिक मशीन यामुळे रेवा इंग्लिश स्कूल आणि सायन्स ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट लाभ होणार आहे.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ट्रस्ट नेहमीच मदतीचा हात पुढे करेल, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी दिली…या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, माजी नगरसेवक अहमद दर्जी, महेश सरदार,जुबेर चौगले,महेश कोलाटकर,सचिन शेडगे,सौ.अवनी शेडगे,निता हजारे,समीक्षा बामणे, रवी चाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच डायमंड संस्थेचे अध्यक्ष समीर दर्जी,अलखैरिया संस्थेचे शफी पानसरे, रेवाचे अध्यक्ष रियाज शेटे, डॉ. फरीद चिमावकर,डॉ.अपूर्व भट,महादेव साळवी,मुबिन कर्जिकर, आरिफ पठाण, कादिर रोगे, सलीम चौगले,उस्मान रोहेकर,आदित्य कोंढाळकर,मजहर सिद्दीक, इलाज डबीर, बिलाल मोर्बेकर, स्वप्नील धनावडे आदी मान्यवरही उपस्थित होते.