खारघर शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉल येथे दीपक शेट्टी एंटरटेनमेंट यांच्यावतीने आठवी मिसेस रायगड २०२५ ग्रँड फिनालेचे भव्य आयोजन करण्यात आले.या सोहळ्यात अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष घरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी दीपक शेट्टी आणि संतोष घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व स्पर्धकांचे स्वागत केले, त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.स्पर्धेतील विजेत्यांनीही मंचावरून आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रमाला मनोरंजन, फॅशन, कला आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम लाभला.