मुंबई शिवसत्ता टाईम्स (वार्ताहर):-
२०१४ मध्ये, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठा समाजाला दिलं १०% आरक्षण. फक्त एवढंच नाही, ते टिकवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला, २.५ कोटी कुटुंबांचा सर्व्हे करून दाखवले की मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे.
मराठा तरुणांना उद्योग सुरू करायचंय? त्यांनी स्थापन केली सारथी संस्था, ज्याद्वारे ५,२२० कोटी रुपयांचे कर्ज ७०,३७५ तरुणांना वितरित केले. विद्यार्थ्यांसाठी सुरू केली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शुल्क माफी योजना ५८,००० विद्यार्थ्यांना ५०० कोटी रुपयांची मदत!
२०१८ मध्ये, फडणवीस सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग कायदा लागू केला, ज्यामुळे मराठा समाजाला मिळाले १६% आरक्षण. २०२४ मध्ये, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित १०% आरक्षण कायदा मंजूर केला.विरोधक? फक्त नाटके आणि आंदोलनं, पण ठोस निर्णय नाही!शरद पवार आणि काँग्रेस? फक्त वक्तव्ये, फक्त भाषणं… प्रत्यक्ष काम किंवा आरक्षण टिकवण्यासाठी काही नाही.
तर सत्य काय आहे?देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर ठोस पाऊले उचलली आहेत.
म्हणून होय… ब्राह्मण देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे शत्रू नाहीत, तर एक सक्षम, समर्पित आणि ठाम नेता आहेत!