उरण तालुक्यात प्रशासनाची तीन माकड प्रवृत्ती… फुंडे पुलाच्या प्रवेशद्वारावर भयानक खड्ड्यांचे साम्राज्य… 

0
8

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यात प्रशासनाने गांधीजींच्या तीन माकडांची भूमिका घेतल्याची चर्चा जोर धरली आहे…ना ऐकतात,ना बघतात,ना बोलतात… त्यामुळे तालुक्यातील छोट्या प्रश्नांसाठी नागरिकांना आवाज उठविण्याची वेळ येऊन ठेपत आहे.         उरण-पनवेल रस्त्यावर फुंडे पुलाच्या उतरणीला एक भला मोठा खड्डा पडला असून विशेषत: मोटारसायकलस्वार सतत धोके पत्करत आहेत. तरीही, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी वर्ग या खड्ड्यांकडे लक्ष न देता आपल्या निद्रास्थितीत आहेत.
भेंडखळ येथील पोलारिस सी.एफ.एस. गेटसमोरही मोठ्या खड्ड्यांची समस्या कायम आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांच्या या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरीही कोणतेही राजकीय नेते किंवा अधिकारी जागेवर दिसत नाहीत.नागरिक प्रश्न विचारत आहेत की,अधिकाऱ्यांना हा खड्डा कधी दिसणार? आणि नेमकी कोणती यंत्रणा जबाबदार आहे? याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.नागरिकांचा म्हणणे आहे, आता घ्या अधिकारी वर्गाला सांभाळून आणि करा प्रवास या खड्ड्यातूनच. ही उद्वेगजनक स्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा थेट फटका आहे.