भाजप हा केवळ पक्ष नाही तर कुटुंब निलेश थोरे यांचे प्रतिपादन… 

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाची मोर्चेबांधणी सुरू झाली असून त्याला मोठी चालना मिळाली आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, माणगाव येथे तालुक्यातील सुरव तर्फे निजामपूर येथील ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमाला युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, ज्येष्ठ नेते संजय आप्पा ढवळे, तालुकाध्यक्ष परेश सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राजक्ता शुक्ला, तालुका सरचिटणीस बाबुराव चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर, महादेव कदम, समीर बक्कम, युवा सरचिटणीस अमोल पवार, श्रीराम कळंबे, नीलम काळे, किसान मोर्चा नयन पोटले, अनिल दांडेकर, समीर पवार, अनिकेत करकरे, अनिल सत्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पक्षप्रवेशात बाबाजी लहाने, सदाशिव लहाने, धोंडू लहाने, दिपक लहाने, नथुराम लहाने, विजय लहाने, प्रितेश लहाने, महेंद्र लहाने, मंगेश खाडे, प्रशांत लहाने, विकास भोनकर, प्रतिक लहाने, नयन लहाने, पंकज लहाने, राजश्री लहाने, अनिता लहाने, मंजुला लहाने, चंदा लहाने, नम्रता लहाने, लतिका खाडे, ऋतुजा लहाने, प्रणाली लहाने, भक्ती लहाने, आकांक्षा लहाने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.

यावेळी बोलताना निलेश थोरे म्हणाले “भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून एक कुटुंब आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तळाशेत जिल्हा परिषद व साई पंचायत समिती गणात भाजप पूर्ण ताकदीने लढेल. सुरव तर्फे निजामपूर गावाच्या विकासकामांसाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर तालुकाध्यक्ष परेश सांगळे म्हणाले “ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.”सर्व नव्याने प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे स्वागत करून सांगळे यांनी त्यांना पक्षात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित केले.