रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी स्थानिक आमदार व शिवसेना नेते भरत गोगावले यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात गणरायाच्या चरणी साकडं घातलं आहे. जिल्ह्यातील विकासकामांना वेग देण्यासाठी आणि प्रलंबित प्रकल्पांना गती मिळण्यासाठी पालकमंत्रीपद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.गणेशोत्सवानिमित्त आयोजित दर्शन कार्यक्रमात बोलताना गोगावले म्हणाले,रायगड जिल्ह्याचे सर्वांगीण विकास व्हावा,जनतेच्या समस्या वेळेत सुटाव्यात यासाठी पालक मंत्रीपद महत्त्वाचं आहे. गणरायाच्या कृपेने हे स्वप्न पूर्ण होईल,अशी आशा आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांमध्ये गती आणण्यासाठी गोगावले यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील या निर्णयाचं स्वागत करत पालक मंत्रीपद गोगावले यांनाच मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.