मध्यरात्रीचा थरार…पोलिसांच्या पाठलागानंतर टेम्पो चालक गजाआड… २ लाख ६५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त…

0
9

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-    

रोहा तालुक्यातील कुंडलिका पुलाजवळील हॉटेल रोहा प्राईड येथे मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी करत असलेल्या गुटखा माफियांवर थरारक कारवाई केली. ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान संशयास्पद पीकअप टेम्पो चालकाला थांबवण्यास सांगितले असता, चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. पोलिसांनी त्वरित पाठलाग करून टेम्पो चालक रोशन सुभाष पैर (रा. चंद्रदर्शन रेसिडन्सी, रोहा) याला पकडले. तपासात गाडीमध्ये लाखों रुपयांचा बेकायदेशीर गुटखा विमल पान मसाला, व्ही-वन तंबाखू, तुलसी पान मसाला आढळून आला.यापैकी २ लाख ६४ हजार ३८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.रोहा पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,६ जणांना अटक करण्यात यश आले आहे. २ जण अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी रोहे शहरातील ५ पान टपरी चालकांनाही ताब्यात घेत न्यायालयीन कारवाई केली, आणि त्यांना अलिबाग कारागृहात पाठवण्यात आले.टेम्पो चालक रोशन पैर याच्याकडून जप्त गुटख्याबाबत माहिती घेतल्यावर, त्याने म्हसळा येथील दोन मुख्य डीलर सुनिल कोकचा आणि नजीर मेमन यांच्या नावांचा उलगडा केला. पोलिसांनी या माहितीच्या आधारे पुढील कारवाई सुरु ठेवली आहे.ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर झालेल्या या कारवाईमुळे रोहा पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिकांनीही या कठोर कारवाईचे स्वागत केले असून प्रशासनाकडून अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.