रायगड राजकारणात थोरवे, गोगावले, दळवी यांना संपवण्याचं प्रयत्न सुरु… 2029 विधानसभेसाठी तटकरेची जोरदार तयारी…

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना पाडाण्यासाठी तटकरेंची रणनिती सुरु पहिला डाव–माणगाव-महाड
भरत गोगावले यांच्या बालेकिल्ला धक्का देण्यासाठी तटकऱ्यांनी राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल केलं एवढंच नाही, स्नेहल जगतापांनाही राष्ट्रवादी पक्षात आणलं. म्हणजे आता गोगावलेंच्या विरोधात मजबूत फळी तयार झाली आहे.
दुसरा डाव – कर्जत
महेंद्र थोरवे यांचा पराभव व्हावा यासाठी अपक्ष म्हणून लढलेले सुधाकर घारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी बसवलं गेलं.सुधाकर घारे यांना चांगला पाठिंबा देऊन थोरवेंच्या पायाखालचं वाळू सरकवण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे.
तिसरा डाव – अलिबाग
महेंद्र दळवी यांचा पराभव करण्यासाठीसुद्धा राष्ट्रवादीचा मोर्चा वळलाय. स्थानिक स्तरावर हालचाली सुरू झाल्यात…थेट दळवींच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शिरकाव करण्याच्या तयारीत आहे.
एकूणच,
तटकरे कुटुंबाने २०२९ साठी रायगडात तीन मोठ्या गडांवर डोळा लावलाय गोगावले, थोरवे, दळवी.आणि या तिन्ही गडांवर विजय मिळवण्यासाठी तडकाफडकी हालचाली सुरू झाल्यात.रायगडचा पुढचा पाच वर्षांचा राजकीय खेळ…खूपच रंगतदार होणार हे नक्की!