पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात रायगडसह संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे.नवी मुंबई आणि पनवेलमध्येही गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं. वाजतगाजत,फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर ठेका धरत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं.
समाजातील विविध स्तरांतील नागरिक, प्रसिद्ध उद्योजक, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री यांच्या घरीही गणपतीची स्थापना झाली आहे.सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्यांची जपवणूक करत हा उत्सव साजरा होत आहे.याच उत्साहात, रायगड जिल्ह्यातील पाले बुद्रुक येथील प्रसिद्ध उद्योजक योगेश तांडेल यांच्या ‘गोविंद’ निवासस्थानी बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.तांडेल कुटुंबाचा कौटुंबिक गणपती म्हणून हा बाप्पा परिसरात प्रसिद्ध आहे.यावेळी योगेश तांडेल आणि तालुका प्रमुख संदीप तांडेल यांनी सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.तांडेल कुटुंबीयांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना गणरायाच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला.
यावेळी,रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्यासह प्रदीप ठाकूर यांनीही योगेश तांडेल यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.शिरीषदादा आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.हा उत्सव केवळ पूजा-अर्चा नसून,सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक बनला आहे,हेच या उत्सवातून दिसून येत आहे…