रसायनी-मोहोपाडा परिसरात गौरी गणेश विसर्जनांचे भक्ती भावाने विसर्जन… टाळ मृदुंगाच्या गजरात फटाक्यांची आताषबाजीत दिला भावपूर्ण निरोप…

0
11

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

बुधवार दि २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांच आगमन झाले…मोठ्या उत्साहात वाजत गाजत भक्ती भावाने गणरायाचे आगमन गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवार दि‌.२७ ऑगस्ट रोजी झाल्यानंतर मंगळवार दि.२ सप्टेंबर रोजी  गौरी गणपतीचे विसर्जन रसायनी मोहोपाडा परिसरात मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

लाडक्या गणपती बाप्पांना व दीड दिवसासाठी पाहुणी म्हणून आलेल्या गौरीला रसायनीकरांनी फुलांची उधळण करत ढोल ताशा टाळ मृदुंगांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत पुढच्या वर्षी लवकर या अटीवर रिस येथील ओढा,नवीन पोसरी मोहोपाडा येथील तलाव,पाताळगंगा नदीच्या किनार्यावर गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर  यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता…