उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
उरण तालुक्यातील खोपटा गावातील पाटील पाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवागौरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे…यावर्षी उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे प्रभू श्रीरामांनी समुद्रातून श्रीलंकेसाठी बांधलेल्या रामसेतूचा देखावा.या देखाव्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, समुद्र देव व हनुमंत राया अशा चार भव्य मूर्ती उभारण्यात आल्या असून त्या खोपटा गावातील म्हात्रे पाड्यातील भाया पेंटर यांच्या कारखान्यात तयार केल्या गेल्या आहेत.मुख्य पूजनासाठीची शिवमूर्ती श्री गणेश आणि पार्वतीमातेच्या सोबत देखील अतिशय हुबेहूब साकारण्यात आली आहे.१ सप्टेंबरला सकाळी ७ वा.शिवागौरा आगमन, ११ वा.अभिषेक पूजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ११ वा. शिवगौरा जागरण व पारंपरिक भवर नृत्य.२ सप्टेंबरला सकाळी ७ वा. आरती, दिवसभर दर्शन, रात्री ८ वा. जॉनी रावत यांचा सुपरहिट ऑर्केस्ट्रा (गीत, संगीत, कॉमेडी, लावणी).३ सप्टेंबरला दिवसभर भक्तिमय कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रात्री ९ वा. ह.भ.प. अलका सतीश वाल्हेकर (नसरापूर, पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले… शिवगौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विसर्जन सोहळा.यावेळी पारंपरिक शक्ती तुरे आणि जंगी नृत्यस्पर्धा घेण्यात येतात.शिवगौऱ्याच्या ठिकाणी घुंगरू वाजलेच पाहिजेत या धार्मिक भावनेतून पहिली बारी मंडळाच्या मंडपात साजरी होते आणि त्यानंतर हजारो भाविकांनी भरलेल्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे २०-२५ हजार भाविकांची उपस्थिती राहणार आहे. विविध बेंजो पथकांच्या तालावर भाविक अक्षरशः बेधुंद होऊन नाचतात. साधारण सायंकाळी ७ वाजता सार्वजनिक आरतीनंतर शिवगौऱ्याचे विसर्जन करण्यात येते.विसर्जनावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात. वर्षभर प्रतीक्षा केलेला हा सोहळा गावकरी व भाविकांसाठी एक अध्यात्मिक व सांस्कृतिक पर्व ठरतो.