भाऊकीचं नातं रक्तरंजित…पत्नीच्या संशयातून सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला… रोहा हादरलं…अनैतिक संबंधांच्या संशयातून भावाला ठार मारण्याचा प्रयत्न…

0
5

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रोहा पोलिस ठाणे हद्दीतील महादेववाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी यांच्या दिराने संशयाच्या भरात आपल्या सख्ख्या भावावर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केला.ही घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साधारण ६.३० वाजता महादेववाडी येथे घडली. फिर्यादीच्या घरातील सर्व सदस्य गणेश विसर्जनासाठी महादेववाडी नदीवर गेलेले असताना आरोपीला आपल्या पत्नीचे भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. संशयाच्या भरात आरोपीने घराच्या ओटीवर बसलेल्या भावावर लोखंडी सळईने डोक्यात जबरदस्त वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.या गंभीर हल्ल्यात जखमीचा जीव थोडक्यात बचावला.घटनेनंतर रोहा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ००.४३ वाजता आरोपीला अटक केली.सदर घटनेप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.