नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
नेरळमधील राजेंद्र गुरुनगर येथील अंबिका अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून,अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे.
गणेश राजेंद्र संसरे (वय ३४) हे माथेरान येथे ग्रीन हिल्स नावाचे हॉटेल भाड्याने चालवतात.त्यांच्या कुटुंबातील पत्नी व दोन मुले सध्या गणपती सणानिमित्त पेण येथे गेलेले आहेत.संसरे हे दररोजप्रमाणे सकाळी १०:१५ वाजता घराला सेफ्टी दरवाजा आणि मुख्य दरवाजाला कुलूप लावून हॉटेलच्या कामासाठी माथेरानला गेले होते.दुपारी सुमारे २:३० वाजता त्यांच्या लहान बहिणीला, कल्पिता येणे (फ्लॅट नं. ११०), फ्लॅट खाली जाताना संसरे यांच्या घराचे दोन्ही दरवाजे उघडे दिसले.तिने शंका आल्याने आत जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील कपाट फोडलेले आढळले.तिने तात्काळ गणेश यांना फोन करून माहिती दिली.संसरे यांनी तात्काळ माथेरानहून नेरळला येत सुमारे ३:१५ वाजता घरी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता, सेफ्टी दरवाजा जबरदस्तीने तोडलेला व मुख्य दरवाजा कुलूप तोडून उघडलेला होता…घरातील कपाट फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये समावेश झालेल्या वस्तू :- सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने (हार,अंगठी,टॉप्स, ब्रेसलेट, मंगळसूत्र इ.) अंदाजे ₹९ लाख किंमत ५ ते ६ लाखांची रोख रक्कम आहे…या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड व प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. नेरळ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.