गद्दारांना शून्य बनवू…पुन्हा जिल्हा परिषदेवर लाल बावटा फडकवणार… रायगडात स्थानिक निवडणुका महाआघाडीसोबत लढणार…

0
5

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबतच लढणार असल्याची भूमिका शेकाप नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. शेकापक्षाने ज्यांना मोठे केले,त्यांनी गद्दारी केली. त्या गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे… जिल्हा परिषदेवर पुन्हा लाल बावटा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले… शेकापची रायगड जिल्हा चिटणीस मंडळ आणि नवनिर्वाचित पदाधिकारी, बैठकीचे आयोजन चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी (३ सप्टेंबर) करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मतदान केंद्रस्तरावर काम करून मतदारापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतर्फे आपण लढणार आहोत. जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राहिल, या दृष्टीने मोठ्या जिद्दीने, मनात चीड ठेवून काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. शेकापची जिल्ह्यात साडेचार लाख मते आहेत…  हे निवडणुकांमध्ये दाखवून दिले आहे…