सौ. किर्ती किरण धारणे यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0
2

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम ):- 

कीर्ती किरण धारणे उपशिक्षिका सांगडे ता.खालापूर जि. रायगड यांना रायगड जिल्हा परिषद यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज शिक्षक दिनी हा पुरस्कार रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केला.सौ.कीर्ती किरण धारणे या उपशिक्षिका आहेत. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगडे तालुका खालापूर  येथे सन २०१९ पासून कार्यरत आहेत.

विद्यार्थी गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांचा सामाजिक,सांस्कृतिक विकास होण्याच्या दृष्टीने त्यांचे भरीव कार्य आहे. शैक्षणिक कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. विशेषतः वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड, ग्राम स्वच्छता अभियान प्लास्टिक हटवा मोहीम पथनाट्य जनजागृती कार्यात मोठा सहभाग आहे. सांगडे शाळेची दुरावस्था होती, त्यामुळे गावातील मुले दुसऱ्या गावी जात होती. त्यामुळे पटसंख्या १८ होती.आज  कंपनीच्या CSR निधीतून  शाळा इमारत G-PLUS 1अशी सुसज्ज इमारत बांधून घेतली आहे. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, आता १८ वरून ५८ विद्यार्थी पट संख्या वाढली आहे,शालेय प्रगती व विद्यार्थी गुणवत्ता यासाठी झटणाऱ्या शिक्षिका म्हणून सौ.कीर्ती किरण धारणे यांचा उल्लेख होतो. यापूर्वी खालापूर गटातील जिल्हा परिषद शाळा आदिवासी-खरपुडीवाडी येथे शिक्षणाचे सुंदर कार्य केले आहे. शाळा व्यवस्थापन समिती,पालक व एकूणच  नागरिक , पालक यांच्याशी संपर्क साधून शाळेला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात.

त्यांच्या या विशेष शैक्षणिक योगदानाची दखल रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतली.त्यामुळे सौ.कीर्ती किरण धारणे उपशिक्षिका रायगड जिल्हा परिषद,प्राथमिक शाळा सांगडे यांना रायगड जिल्हा परिषद यांचा  सन २०२५/२०२६ या वर्षाचा जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळावा आहे, सौ.किर्ती किरण धारणे यांचे शाळा व्यवस्थापन समिती शाळा सांगडे,सांगडे ग्रामस्थ आणि महिला मंडळ,पालक वर्ग ठाणेन्हावे ग्रामस्थ,पंचायत समिती शिक्षण विभाग खालापूर,
खालापूर तालुका सर्व शिक्षक  संघटना यांनी अभिनंदन केले आहे. खालापूर तालुक्यातील एकमेव शिक्षक म्हणून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.