नेरळमध्ये दुहेरी घरफोडी…सोनं-चांदीचे दागिने लंपास… सुमन कॉम्प्लेक्स व राजमाता जिजाऊ परिसरात मध्यरात्रीचा धुमाकूळ…

0
3

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

नेरळ येथील सुमन कॉम्प्लेक्स बी विंग येथे दिनांक ७ सप्टेंबर रोजी तसेच राजमाता जिजाऊ तलावाजवळील इमारतींमध्ये दोन घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश करत एकूण ₹६७,००० किमतीचे सोनं व चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.ही चोरी मंगेश अनंत परब, निखिल अशोक आडुळकर, पांडुरंग जयराम शिगवण आणि श्रवण गिरधारीसिंग राठोड यांच्या घरांमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून खालील मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत…३०,००० किमतीचे सोन्याचे घुंगरू असलेले बाळ्यांचे दोन जोड (६ ग्रॅम),२०,००० किमतीचे सोन्याच्या बाळ्यांचे दोन जोड (४ ग्रॅम)

५,००० किमतीचे चांदीचे ब्रेसलेट (१० ग्रॅम),१२,००० किमतीचे चांदीचे पैंजण – तीन जोड (२४ ग्रॅम)असा एकूण मुद्देमाल ६७,००० किमतीचा असून, या प्रकरणी गुन्हा क्रमांक १४२/२०२५ नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय दंड विधान कलम ३३१, ३३१(४), ३००५ आणि ६२ अंतर्गत नेरळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांच्या टीमने भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गच्चे करत आहेत. परिसरात अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी श्रवण गिरधारीसिंग राठोड म्हणाले,नेरळ पोलिसांच्या तपासावर आम्हाला विश्वास आहे. याआधीही त्यांनी गुन्ह्यांचा छडा लावलेला आहे. याही वेळी चोरट्यांना लवकर अटक होईल व मुद्देमाल परत मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”
दरम्यान, नेरळ पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे…