माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
माणगावमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत दोन महिलांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं…मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आठ सप्टेंबर रोजी तक्रारदाराकडून पंधरा हजाराची लाच स्वीकारताना आरोपी सोनल नाडकर वय वर्ष28 राहणार निजामपूर व संजना धाडवे वय वर्ष 29 राहणार माणगाव यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे…ही कारवाई श्रेयस म्हात्रे यांच्या शासन नोंदणीकृत संस्थेची संबंधित कामात झाली आहे.धाकटे शहापूर तालुका अलिबाग येथे खाडीलगत कंत्राट मिळाल्यानंतर तक्रारदार यांच्याकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती…आवश्यक शासकीय तपासणीसाठी 18000 रुपयांची फी भरूनही आरोपी महिला सोनल नाडकर हिने अतिरिक्त 18000 रुपयांची लाचेची मागणी केली तक्रारदाराने याबाबत ४ सप्टेंबर रोजी लाचलुजपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती पडताळणी नंतर आरोपींनी त जडजोडी अंतिम 15000 रुपये घेण्याचे मान्य केले त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचला…या कारवाईत सोनल नाडकर हिला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं तर तिच्या सोबतीने लाच स्वीकारण्यात प्रोत्साहन दिल्याने संजना धाडवे हिला देखील अटक करण्यात आली आहे