नेरळ पोलीस ठाण्यात बाप्पाला गारवा; भावनिक वातावरणात निरोप… पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विसर्जन…

0
6

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

               नेरळ पोलीस ठाण्यात सार्वजनिक भावनेचा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम पाहायला मिळाला,जेव्हा ठाण्यात स्थापना करण्यात आलेल्या गणरायाचे विसर्जन उत्साही आणि भक्ती भावपूर्ण वातावरणात पार पडले.गणेशोत्सवाच्या निमित्ताने नेरळ पोलीस ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशाची मूर्ती मोठ्या भक्तिभावाने स्थापित करण्यात आली होती.प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, कर्मचारीवर्ग तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली.

विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान ढोल, टाळ, आणि फटाक्यांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.नागरिकांनी पोलीसांच्या शिस्तबद्धतेचे कौतुक केले.धार्मिकतेसोबत सामाजिकतेचा संदेश देत या उपक्रमातून पोलीस विभाग आणि नागरिक यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले. विसर्जन कार्यक्रमात स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देत मूर्तीचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं.

पोलिसांनी दिला अनुकरणीय आदर्श :पोलीस हे केवळ कायदा राखणारे नसून,समाजातील सण-उत्सवांचे एक अविभाज्य अंग आहेत, हे पुन्हा एकदा या विसर्जन सोहळ्यातून अधोरेखित झाले. उपस्थित नागरिक आणि लहान मुलांमध्येही उत्साह दिसून आला. ज्या वेळेस प्रत्येकाच्या घरात गणपती विराजमान होते त्या वेळेस पोलीस आपले कार्त्याबाजावत होते. शिस्त, भक्ती, पर्यावरण प्रेम आणि समाजाशी जोडलेपण याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेरळ पोलीस ठाण्याचा हा गणेशोत्सव ठरला, असे मत अनेकांनी व्यक्त केले.