माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
माणगाव शहरात मिसिंग झालेल्या एका घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,योगिता कन्हैया बिडकर (वय २९,राहणार माणगाव) ही महिला दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत घरातून काहीही न सांगता बाहेर पडली होती.त्यानंतर त्या अद्याप घरी परतल्या नाहीत.या संदर्भात पती कन्हैया हरिराज बिडकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे..
सदर बेपत्ता महिलेचे वर्णन अंगाने सडपातळ,रंग सावळा,केस लांब चॉकलेटी टॉप निळ्या रंगाचा पायजमा असे आहे… या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांनी कुणाला सदर महिला दिसल्यास त्वरित माणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

