पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेलमध्ये आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून एक मोठं विधान आलं आहे.जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी थेट आरोप केला जनसुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीवरची दडपशाही आहे… त्यांनी सांगितलं,हा कायदा लोकांच्या अधिकारांना गालबोट लावणारा आहे. जनतेच्या आवाजाला दाबण्यासाठी सरकारनं हा मार्ग काढला आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असतील, आंदोलनं होतील,प्रश्न विचारले जातील पण त्यावर उत्तरं द्यायची,प्रश्न दाबायचे नाहीत…
शिरीष घरत यांनी ठामपणे मागणी केली हा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावा.
त्यांनी अजून पुढे इशारा दिला की,सरकार लोकांच्या हक्कावर गदा आणत असेल, तर जनता शांत बसणार नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना आवाज दडपून ठेवता येणार नाही… आजच्या या विधानामुळे पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे.जनतेत चर्चा सुरू आहे…हा विधेयक खरंच सुरक्षेसाठी आहे की मग लोकांना गप्प करण्यासाठी?आता पुढे सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब, जन सुरक्षा विधेयक विरोधी समिति प्रमुख उल्का महाजन, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी (श.प.) जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, स.पा. जिल्हाध्यक्ष अनिल नाइक, शेकाप नेते काशीनाथ पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरूनाथ पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, उपशहर प्रमुख हरेश पाटील, शहर संघटक संतोष गोळे, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, विधानसभा अधिकारी अजय पाटील, महिला आघाडी शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.