पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नमस्कार मंडळी, आजचा दिवस शिवसत्ता टाइम्ससाठी ऐतिहासिक आहे २० लाख आगरी-कोळी समाज आमच्यासोबत जोडला गेला आहे ! याचा अर्थ, पुढे जे काही आम्ही दाखवू, बोलू किंवा मांडू ते थेट २० लाख लोकं पाहतील, ऐकतील आणि अनुभवतील.
मुंबई ही फक्त आणि फक्त आगरी-कोळी समाजाची आहे. लालबागच्या राजाचे खरे राखणदार हाच समाज आहे. यंदा पनवेल महापौर ठरवणारा देखील आगरी-कोळी समाजच असेल हे जेव्हा शिवसत्ता टाइम्सने दाखवलं, तेव्हा हा व्हिडिओ समाजात प्रचंड चर्चेत आला. आज त्याचा परिणाम म्हणजे तब्बल २० लाख आगरी-कोळी बांधवांनी आमच्याशी नातं जोडलं आहे. अनेक आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवरांनी आमच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
शिवसत्ता टाइम्स पुढेही आगरी-कोळी समाजाच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहणार आहे. तुमच्या समस्या, संघर्ष आणि लढा हे सगळं आमच्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडलं जाणार आहे. आज आम्ही एकच सांगू इच्छितो धन्यवाद आगरी-कोळी समाज ! तुमच्या विश्वासामुळे, शिवसत्ता टाइम्स अधिक सामर्थ्यवान होत आहे.