नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी 15 दिवसांपासून बेपत्ता पत्नीला शेवटचा फोन… आणि फोनवरच ‘ते’ बोलणं ठरलं शेवटचं…

0
4

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोमनाथ फापाळे हे गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत.दररोज गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलीस खात्यातीलच एक कर्मचारी असा अचानक गायब होतो आणि त्याच्या शोधासाठी त्याच्या कुटुंबियांनाच रस्त्यावर उतरावं लागतं, ही खरंच व्यवस्थेची शोकांतिका आहे. सोमनाथ फापाळे हे मूळचे एका लहानशा गावातून आलेले, कष्टाने पोलीस भरती झालेले आणि घरचा एकमेव आधार… सोमनाथ हे बेपत्ता झाल्याने त्यांच्या शोधासाठी त्यांचे गावकरी, नातेवाईक आणि जवळपासचे शंभरहून अधिक लोक थेट नवी मुंबईत दाखल झाले आहेत.कुणी हातात फलक घेतला होता न्याय मिळेपर्यंत उठणार नाही!तर कुणी त्यांचा फोटो उंचावत रडत होतं.सोमनाथ म्हणजे आमच्या गावाचा मान होता. त्यानेच इतर तरुणांना प्रेरणा दिली आणि आज त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत,असं गावच्या सरपंचांनी सांगितलं.सोमनाथच्या पत्नीने सांगितलं की, ती जेव्हा फोनवर त्याच्यासोबत बोलत होती.तेव्हा तो टेन्शनमध्ये होता.तुला नंतर सांगतो आता चार्जिंग कमी आहे फोनला असं म्हणत त्यांनी फोन ठेवला.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर कुटुंबीय आणि गावकरी ठिय्या देऊन बसले.रस्त्यावर वाहतूक अडली,पण प्रशासन मात्र शांत.काही वेळाने वरिष्ठ पोलीस अधिकारी आले आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना शांत करत म्हटलं, बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. त्यांनी हे देखील मान्य केलं की प्रकरण गंभीर असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.पोलीस दलात काम करणाऱ्या एका तरुणाचा पत्ता लागत नाही आणि त्याचे आई-वडील, भावंडं, गावकरी न्यायासाठी गेटबाहेर रडावं लागतं, हे व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं. पण विचार करा शहरात जिथे माणसं इतकी बीझी असतात की त्यांना आपल्या शेजारी कोण राहतं हे कधी कधी माहिती नसतं. पण गावातील माणसं सोमनाथसाठी मुंबईला येऊन चक्क आंदोलन करत आहेत. ज्या पोलीस डिपार्टमेंटसाठी सोमनाथ काम करत होता त्या लोकांनी हा विषय एवढा महत्व देऊन सोडवला नाही आणि आता गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे हे प्रकरण क्राईम ब्रँचला देणार आहेत.पोलीस दलात काम करणाऱ्या माणसालाच जर सुरक्षा नाही, तर तुमच्या-आमच्या सारख्यांचं काय? तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.