नाशिक शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नाशिक जिल्ह्यात चार-चार मंत्री असूनही कायदा व सुव्यवस्थेची वाताहत झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.सकाळी कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या पत्रकारांवर पावती फाडणाऱ्या गुंडांनी थेट हल्ला चढवला.नाशिकचे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे आणि अभिजित सोनावणे यांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली.या हल्ल्यात तिघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.गुंडांची ही धाडसी गुंडागर्दी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे भयावह चित्र उघड करत आहे. जिल्ह्यात चार मंत्री असतानाही आजवर पालकमंत्रीची नियुक्ती न झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून गुन्हेगारांचा मोर्चा अक्षरशः मोकाट सुटल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.महिला अपहरण,गोळीबार, चोरी यांसारख्या घटनांनी आधीच नागरिकांच्या अंगावर काटा आणला होता; त्यात आता पत्रकारांवरील हल्ल्याने नाशिकच्या कायद्याला सरळसरळ आव्हान दिले आहे.या घटनेनंतर नागरिकांचा संताप उसळला आहे. हे सरकार झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल सोशल मीडियावर उठत आहे.अखेर दबाव वाढल्यानंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती मिळते.मात्र, फक्त आदेशांवर गुंड थांबणार नाहीत, हे स्पष्ट असून नाशिकमध्ये मंत्री चार, पण कायदा शून्य हेच वास्तव ठळकपणे समोर येत आहे.