खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील बेलपाडा गावात श्री साईबाबा उत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.सोमवार,दि.१३ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजल्यापासून अभिषेक, पूजन आणि आरतीने उत्सवाची सुरुवात झाली.पहाटेपासूनच साईनाम आणि भजन-कीर्तनांच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता.सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ह.भ.प. निवृत्ती महाराज पाटील (विठ्ठल) यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी कीर्तनाने उपस्थित भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा लाभली.या कीर्तनात भानुदास महाराज, मारुती महाराज आणि मधुकर महाराज यांचाही सहभाग होता. दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. श्रद्धाळूंनी मोठ्या भक्तिभावाने प्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बेलपाडा गावातील सर्व ग्रामस्थ आणि साईभक्त मंडळ यांनी समन्वय साधून परिश्रम घेतले.संपूर्ण दिवस भक्तिभाव,सामूहिक सहभाग आणि उत्साह याने गावाचे वातावरण उजळून निघाले.