रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यातील रोहा-अष्टमी नगरपरिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या नगराध्यक्षपदासाठी महिला ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी उपनगराध्यक्षा सौ. शिल्पा अशोक धोत्रे यांचे नाव आघाडीवर आहे.
अशोक धोत्रे हे खासदार सुनील तटकरे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्ते मानले जातात. त्यामुळे त्यांचा पत्नी शिल्पा धोत्रे यांचा नावाचा विचार होऊ शकतो पक्षीय स्तरावर पाठबळ मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.धोत्रे या वार्ड क्रमांक ९ मधून सलग दोन वेळा निवडून आल्या असून नगरपरिषदेत सभापती आणि उपनगराध्यक्षा अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. शहराच्या सामाजिक आणि नागरी विकासात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, त्यांच्या शिस्तबद्ध आणि अभ्यासू नेतृत्वामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.महिला ओबीसी आरक्षणामुळे शिल्पा धोत्रेंना संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे.
शिल्पा धोत्रे या सुशिक्षित, अनुभवसंपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पती अशोक धोत्रे हे वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी व्ही.जी.एन.टी. संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांचा विविध समाजघटकांमध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे ही उमेदवारी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शिल्पा धोत्रेंना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली, त्यांच्या अनुभवाचा आणि लोकसंपर्काचा उपयोग शहराच्या विकासासाठी होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.रोह्यातील राजकारण नेहमीच चुरशीचे राहिले असले, तरी यावेळी महिला नेतृत्वाच्या संधीमुळे शहराला स्थिर, अनुभवी आणि समाजाभिमुख नगराध्यक्ष मिळू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे