महाड रेल्वे जंक्शनसाठी रवींद्र चव्हाण यांचा ठाम पाठपुरावा खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन…

0
30

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे महाड शहरातील दीर्घ प्रलंबित रेल्वे जंक्शनच्या मागणीस गती मिळाली आहे. या विषयावर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाड तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीस कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील अधिकारी, महाड पोलिस निरीक्षक,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकारी, तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाड शहराध्यक्ष पराग वडके यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.या पार्श्वभूमीवर आता ४ नोव्हेंबर रोजीची ही महत्त्वाची बैठक होणार आहे.

या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडी लोकसभा चे खासदार सुरेश गोपीनाथ (बाळ्या मामा) म्हात्रे यांना केले आहे. या संदर्भात माननीय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने महाड रेल्वे जंक्शन विषयावरील अर्ज सादर करत लोकसभा प्रतिनिधी यांची भेट घेतली.
रवींद्र चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारामुळे महाड रेल्वे जंक्शनची ऐतिहासिक मागणी आता निर्णायक टप्प्यावर आली असून, महाड शहराच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.