कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास आणि मेंदूची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ‘ब्रेनसेतू अकॅडमी’चा उद्घाटन सोहळा व शैक्षणिक सेमिनार कर्जत येथील रॉयल गार्डन येथे संपन्न झाला.मेमरी आणि ब्रेन यामध्ये जो ब्रिज बनेल तीच अकॅडमीचे कार्य आहे,या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन या सेमिनारमध्ये करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन खडे सर यांच्या हस्ते झाले.वीरेंद्र जाधव,विजय मोहिते,सुप्रिया बोराडे आणि गायत्री जाधव यांनी उपस्थितांना मेंदू प्रशिक्षण,
एकाग्रता व आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग दाखवले. या अभिनव उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अकॅडमीचे मुख्य केंद्र हिरानंदानी, पनवेल येथे असून, पुढील काळात प्रत्येक गावात शाखा सुरू करून हा उपक्रम व्यापक करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 8805333303 या क्रमांकावर किंवा info@brainsetuacademy.com
या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

