महाडमध्ये राजकीय रणसंग्राम… मनसे-शिंदे गट आमनेसामने… मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांना गोगावले समर्थकांकडून जबर मारहाण…

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड शहरात मनसे आणि शिंदे गटातील वाद चिघळला असून,या वादाचा गंभीर परिणाम आज पाहायला मिळाला.महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर गोगावले समर्थकांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.त्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली होती.यावर मनसे शहराध्यक्ष उमासरे यांनी गोगावले यांना थेट प्रत्युत्तर दिलं होतं.

त्याच वादाची ठिणगी अखेर हिंसाचारात बदलली असून, आज गोगावले समर्थकांनी उमासरे यांना महाडमध्ये मारहाण केली. सध्या त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेमुळे महाडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे