३ नोव्हेंबरपासून श्री बद्रीनाथ यात्रा उत्सवाचा प्रारंभ…

0
1

जळगाव शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :- 

संत श्री सखाराम महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या बोरी नदीच्या तीरावर असलेल्या खान्देश मधील जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर,शिरसोदे, महाळपुर पंचक्रोशीत वसलेल्या बहादरपूर गावात १२जून १९२४ रोजी श्रीमंत शेठ कै.रामलाल काळूराम मिश्र यांनी श्री. बद्रीनारायन मंदिराची स्थापना केली.

पूर्वी हिमालयामधील प्रवास हा अत्यंत कष्टप्रद व खडतर होता.उंच पहाड खोल दऱ्यातून पाय वाटेच्या माध्यमाने भाविक श्री बद्रीनारायन श्री केदारनाथ यांची यात्रा प्रतिकूल हवामान दळण वळणाची अत्यल्प साधने यांच्या सहाय्याने श्री बद्रीनाथावरील भक्ति पोटी सर्व कष्टांना तोंड देत करत असत. बहादरपूर गावाचे रहिवाशी असलेले कै.रामलाल काळूराम मिश्र यांनीही भगवंताच्या भक्तिपोटी श्री बद्रीनाथ यात्रेला जायचे ठरवले.

भगवंताचा नावाचा गजर करत सादर दांपन्त्य श्री भगवंताच्या दर्शनासाठी निघून आपल्या जन्माचे सार्थक केले.कष्टमय प्रवास अनेक अडचणींना  तोंड देत मिश्र दामंप्त्य भगवंताच्या दर्शनास पोहचले.परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळेच असावे.मिश्र दाम्पंत्य देवाचं दर्शन घेणार तोच तेथील पूजऱ्याने त्यांना हटकले.तुम्ही ब्राह्मण नाहीत,तुम्ही देवाचा पाया पडू शकणार नाहीत तुम्हाला दर्शनाचा अधिकार नाही असे उर्मटपणे सांगून सदर दाम्पत्यास देवाचा दर्शनापासून वंचित ठेवले.मिश्र यांनी आम्ही ब्राह्मणच आहोत असे वारंवार सांगून देखील तेथील पूजऱ्याने त्यांना दर्शन रांगेतून बाहेर काढले.देवाच्या जवळ येवून सुद्धा आपल्याला व्यवस्थित रित्या दर्शन घेता आले नाही याची शल्य दुःख दोघ पती पत्नीस अस्वस्थ करून गेली.त्यांच्या डोळ्यात पानी आले भगवंत माझ्या काय असा अपराध झाला की तुझे एवढ्या लांब येवून सुद्धा  दर्शन झाले नाही.

अशा विनामनस्क स्थितहीत सदर दामप्त्य आपल्या धर्मशाळेत परत आले.जीवाला लागलेली हुरहूर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती,रात्री विचार करता करता त्यांचा डोळा लागला. रात्री स्वप्नात त्यांना भगवंताचा भास झाला. जणू काही भगवंत आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी रामलाल शेठ यांच्या स्वप्नात आले.त्यांनी स्वप्नात दृष्टान्त देऊन रामलाल शेठ यांना सांगितले आज तुला दर्शन झाले नाही ना.. मग मला तुझ्या गावी घेऊन चल.. आणि माझी विधिवत स्थापना करून रोज माझे दर्शन घे.सकाळी उठल्यानंतर त्यांनी सदर प्रकार आपल्या पत्नीस सांगितला.त्यांच्या पत्नी कै.सौ.कलावती आई यांनी मालकांना हा देवाचा आपणासाठी आदेश आहे.आपण देवाने सांगितल्याप्रमाणे आचरण करावे.

आता मालकांना कधी एकदा घरी पोहचतो आणि देवाच्या आदेशानुसार कधी एकदा मंदिर उभारतो याचा ध्यास लागला. गावी परत आल्यावर आपल्या मालकीची २७ गुंठे जमीन श्री बद्रीनारायन देवतेच्या नावे करून विधिवत मंदिर उभारण्याचे काम सुरू केले.श्री.बद्रीनाथ भगवंताच्या मूर्ती जयपूर येथील कारागिरांकडून बनवण्यात आल्या. अत्यंत सुंदर,सुबक,आखीव, रेखीव अशा मुतीऀ जयपूर येथील कारागिरांनी बनवून दिल्या.

१२जून १९२५ रोजी श्री बद्रीनारायनजी,श्री लक्ष्मीजी,श्री केदारनाथ जी तसेच श्री उद्धव,श्री कुबेर,श्री गणेश,श्री नारणारायन,श्री नारद,व श्री गरुड महाराज यांची विधिवत स्थापना काशी च्या तसेच गावातील ब्राम्हणाच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.मागील वर्षी म्हणजेच सन २०२४मध्ये मंदिराला १०० वर्ष पूर्ण झाले.श्री बद्रीनाथाचे भारतातील द्वितीय स्थान असलेले मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपुर गावी केवळ मालक कै.रामलाल काळूराम मिश्र यांच्या प्रयत्नाने आत्म समर्पणाने उभारले गेले.

मालक एवढयावरच थांबले नाहीत,मालकांच्या मनात जाती पाती भेद नष्ट करणे तसेच धार्मिक सलोखा वाढवून सर्व जन आनंदाने व गुण्या गोविंदाने राहावे,यासाठी श्री बद्रीनाथ भगवंताच्या यात्रेचे नियोजन केले.त्यांच्या दूर दृष्टीमुळे आज गावात आपले पणाची भावना निर्माण झाली.गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये,यासाठी नूतन शिक्षण संस्थेची मुहूर्त मेढ रोवून गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती मध्ये मोलाचे योगदान दिले.त्यांनी भगवंतसाठी अत्यंत सुबक असे वहन,भव्य दिव्य असा रथ गावातील कारागीर कै.पुंजु बाविस्कर व त्यांचे सहकारी यांनी तयार केला.सदर रथाची ऊंची ३० फुट असून तालुक्यातील भव्य रथांमध्ये त्याची गणना होते.

दरवर्षी कार्तिक शु. त्रयोदशी रोजी सायंकाळी श्री वहनाची अत्यंत भव्य अशी मिरवणूक निघते. लाईटयांच्या झगमगाट ढोल ताशांचा गजर शाळेतील विद्यार्थ्यांचे आकर्षक असे ढोल व लेजीम पथक,गावातील विविध मंडळाचे ढोल पथक,यांच्या उत्साही वातावरणात बद्रीनाथाची मिरवणूक संध्याकाळी गावातून निघते.

भगवंताचा रथ पूर्ण उत्साहात कार्तिक शुद्ध चतुर्दशी रोजी वरील प्रमाणे उत्साहात व आनंदात भगवंताच्या नामाचा गाजर करत गावातून भक्तांना दर्शनासाठी परिक्रमा करतो.कार्तिक शुद्ध पौर्णिमेस भगवंत पालखीत आरुढ होऊन भक्तांच्या दर्शनासाठी गावात येतात.याच साठी केला होता अट्टाहास ही मालकांची मनातील भावना पूर्णत्वास गेल्याचे समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.मी एवढ्या लांब येवून ही मला देवाचे नीट दर्शन घेत आले नाही परंतु,माझ्या पंचक्रोशीतील भक्तांना सहज दर्शन उपलब्ध व्हावे,ही भावना त्यांच्या मनात होती.ती पूर्ण होते.

यात्रे निमित्त गावातील बाहेर गावी स्थायिक झालेली मंडळी दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने बहादरपूर गावात येतात आपल्या इष्ट मित्रांच्या भेटी गाठी घेण्याचा योग यात्रेनिमित्त येतो. नात्यातील विण यामुळे अधिकच घट्ट होण्यास मदत होते.
माझे मी पण गळून जावो,ही उक्ती सार्थ झाल्याचे यावेळेस आपल्याला पाहायला मिळते.

यंदा वहन दि. ३ नोव्हेंबर,रथ दि. ४ नोव्हेंबर,पालखी दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी तर ६ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी भगवंताच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व आपल्या जन्मयचे सार्थक करावे असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण समाज बहु.संस्था बहादरपूर यांच्या पदाधिकाऱ्यांकडून भाविकांना करण्यात येत आहे.