माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
रायगड–पुणे सीमेजवळील ताम्हिणी घाटात सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पुण्याहून कोकणाच्या दिशेने फिरायला निघालेल्या सहा तरुणांची महिंद्रा ठार गाडी एका धोकादायक वळणावर नियंत्रण सुटून तब्बल ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळली.धडकेचा जोर इतका प्रचंड होता की थारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि सहाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये शहाजी चव्हाण (22),पुनीत सुधारक शेट्टी (20) ,साहिल साधू बोटे (24),महादेव कोळी (18),ओंकार सुनील कोळी (18) ,अरुण माने (19) यांचा समावेश आहे…
ही सर्व मंडळी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यातून कोकणाकडे रवाना झाली. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात आला आणि ताम्हिणी घाटातील खोल दरीत गाडी कोसळल्याची घटना उघडकीस आली.घटनास्थळी माणगाव पोलीस, शेलार मामा रेस्क्यू टीम, तसेच RESQ रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढले.या घटनेनंतर प्रशासनाने ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.ताम्हिणी घाटातील वळणं आणि अंधारे कडे दिवसेंदिवस जीवघेणे ठरताना दिसत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

