खोपोलीत थेट महायुद्ध! शेंडे vs पाटील 32 जागांची प्रतिष्ठेची लढत ताणली… महायुतीचा विश्वास की परिवर्तनाचा झंकार? खोपोलीत दोन्ही गटांमध्ये चुरस…

0
7

खोपोली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडच्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण 32 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतेय. या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना शिंदे महायुतीचे उमेदवार कुलदीप शेंडे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष परिवर्तन आघाडीचे उमेदवार डॉ.सुनिल पाटील यांच्यात चूरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचारात जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा व प्रतिसाद मिळत असून महायुतीचे शिलेदार बहुमताने निवडून येतील असा विश्वास शेंडे यांनी व्यक्त केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. येत्या काळात सत्तेत विराजमान होऊन मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्याबरोबरच जनतेला अपेक्षित विकास घडवून आणणार असल्याची ग्वाही महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांनी दिली.तर विजयाचा गुलाल आम्हीच  उधळणार असा विश्वास देखील कुलदीप शेंडे यांनी व्यक्त केलाय.