श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र सातनाक… सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी-भाजप युतीचा एल्गार…

0
3

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (संदेश पेडणेकर):- 

श्रीवर्धन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि भाजप यांनी एकत्र येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.या युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांच्या प्रचारार्थ कसबा पेठ येथे झालेल्या कॉर्नर सभेने श्रीवर्धनच्या राजकारणात मोठा उत्साह संचारला आहे…या महत्त्वपूर्ण सभेला खुद्द खासदार सुनीलजी तटकरे यांनी उपस्थित राहून युतीच्या उमेदवारांना ताकद दिली.त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सातनाक, मुरकर मॅडम, विचारे साहेब, सबीस्ता मॅडम, सबा मॅडम, पाटील आणि युतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या खास शैलीत विद्यमान सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली. त्यांनी जनतेला विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.श्रीवर्धनचा विकास करायचा असेल, तर आता नुसती आश्वासने देणाऱ्यांना बाजूला सारावे लागेल.जितेंद्र सातनाक आणि युतीचे उमेदवार हे श्रीवर्धनला एक नवी दिशा देतील.नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांनी विकासाचा अजेंडा स्पष्ट केला.त्यांच्या भाषणाला आणि युतीच्या उमेदवारांना कसबा पेठेतील सर्वसामान्य नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रतिसाद दिला.श्रीवर्धनचा चेहरा बदलणार’ या घोषणेमुळे संपूर्ण कसबा पेठ दणाणून गेली होती.राष्ट्रवादी आणि भाजपच्या या अभूतपूर्व युतीने श्रीवर्धनच्या जुन्या सत्ताधाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. ही युती श्रीवर्धनच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरणार, असा स्पष्ट इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे…